अहमदनगर : कीर्तनाच्या माध्यमातून आज रंगणार ‘विठूभक्तीचा प्रवाह’; ‘दुहेरी’ मालिकेतील कलाकार राहणार उपस्थित

0

अहमदनगर : महाराष्ट्राला वारकरी संप्रदाय आणि कीर्तनाची मोठी परंपरा आहे. संतांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं होतं. आता या कीर्तन परंपरेच्या माध्यमातून विठूमाऊलीच्या नामाचा गजर होणार आहे. आज (गुरुवार) सायंकाळी 5.30 वाजता सावेडीतील दत्त मंदिर येथे ‘विठूभक्तीचा प्रवाह’ हा कीर्तनाचा कार्यक्रम रंगणार असून, सुप्रसिद्ध कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं कीर्तन ऐकता येणार आहे. सोबत स्टार प्रवाहच्या प्रसिद्ध ‘दुहेरी’ मालिकेतील कलाकार सिद्धेश प्रभाकर म्हणजेच रितेश आणि अमृता पवार म्हणजेच नेहा या कीर्तनाला हजर राहणार आहे.

‘विठूभक्तीचा प्रवाह’ या कीर्तनाच्या कार्यक्रमाद्वारे विठ्ठल चरित्र ऐकता येणार आहे. ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज पाटील या कार्यक्रमात कीर्तन करणार आहेत. त्यांच्या खास शैलीत विठ्ठल चरित्र ऐकणं हा आनंददायी आणि मन शांत करणारा अनुभव ठरणार आहे.

या कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश मिळणार आहे.

LEAVE A REPLY

*