अहमदनगर : केडगावात सेना – राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये राडा

0

केडगाव : केडगाव येथील शांती वनात अत्यं संस्कारासाठी आलेल्या शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली . यात आमदार संग्राम जगताप तसेच शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते नुकतेच शिवसेनेत आलेले हर्षवर्धन कोतकर यांच्यात किरकोळ कारणावरून राडा झाला . यामुळे केडगावात तणाव निर्माण झाला असुन मोठा पोलिस फौजफाटा दाखल झाला आहे .

याबाबत समजलेली माहिती अशी की केडगाव येथील रावसाहेब सुंबे यांच्या अत्यं विधीचा कार्यक्रम सकाळी ९ ला केडगाव अमरधाम ( शांतीवन ) येथे सुरू होता . अत्यं विधी झाल्यानंतर नव्याने शिवसेनेत आलेले कॉग्रेसचे माजी पदाधिकारी भानुदास कोतकर यांचे पुतणे हर्षवर्धन कोतकर हे शांतीवनाच्या बाहेर आले . त्यांचा धक्का राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या वाहनाला लागला . यावरून जगताप समर्थक व कोतकर यांच्यात हमरीतुमरी सुरू झाली .

शिवसेनेचे नगरसेवक दिलीप सातपुते मध्ये आले त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी सांगितली . यामुळे तणाव आणखी वाढला .

जगताप समर्थक मोठया संख्येने जमा झाल्याने राष्ट्रवादी व शिवसैनिकात राडा सुरू झाला . घटनेची माहिती समजताच पोलिस फौजफाटयासह केडगावात दाखल झाले . आता केडगावात शांतता असली तरी गावात तणाव निर्माण झाला आहे .

LEAVE A REPLY

*