Type to search

मुख्य बातम्या सार्वमत

तौसिफ शेख मृत्यू प्रकरण ; पाच जणांवर ठपका

Share

अहवाल कलेक्टरांना सादर

अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्जत येथील तौसिफ शेख या युवकाच्या आत्महत्या प्रकरणा संदर्भात नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे दाखल झाला आहे. अहवालामध्ये चार ते पाच जणांवर ठपका ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समजली.

शेख मृत्यू प्रकरणात दोषी कोण हे सांगण्यास प्रशासनाकडून असमर्थता दर्शविण्यात आल्याने नेमके दोषी कोण? याबाबत तर्कविर्तक लढविले जात आहेत. प्रशासनाकडून यासंदर्भात कोणतीच माहिती दिली जात नसून निवासी उपजिल्हाधिकारी पाटील यांनी संबंधीत प्रकरणाची माहिती जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने दिली जाईल असे स्पष्ट केले आहे.

कर्जत शहरामध्ये दावल मलिक या धार्मिक ट्रस्टच्या भुखंडावर गाळेधारकांनी केलेले अतिक्रण हटविण्यासाठी तौसिफ शेख या तरुणाने 28 जुन 2018 रोजी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. 20 ऑगस्ट रोजी अतिक्रमण हटविण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. मात्र कोणतीच कारवाई न झाल्यामुळे 10 डिसेंबर 2018 रोजी आत्मदहन करण्याचा इशारा शेख यांनी दिला होता. 20 डिसेंबर रोजी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आत्महदन केले. 21 डिसेंबरला त्यांचा या घटनेत मृत्यू झाला होता.

शेख यांच्या मृत्युने प्रशासकीय पातळीवर चांगलीच खळबळ उडाली. शेख यांच्याकडे वेळीच लक्ष का दिले नाही, अतिक्रमण होते तर शेख यांचा मृत्यू झाल्यानंतर सर्वच अतिक्रमण उद्ध्वस्त कसे झाले, यासह एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी शेख कुटुंबीयांनी केली होती. या घटनेला महिना उलटून गेला आहे.

शेख यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच वरिष्ठ अधिकार्‍यांच्या समितीची नेमणूक करण्यात आली होती. या समितीने या सर्व प्रकरणाची माहिती घेऊन आलेले सर्व मुद्दे व आलेल्या तक्रारी या बाबत सुद्धा तपासणी केली. त्यासंदर्भात अहवाल तयार करून त्यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सादर केला आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!