Type to search

Breaking News आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

Breaking : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकाने पेटवून घेतले

Share

सार्वमत ऑनलाईन

पिडीताला वाचण्यासाठी जीवाची पर्वा न करता पत्रकार धावले
अहमदनगर (प्रतिनिधी) – कर्जत तालुक्यातील दावल मलिक ट्रस्टच्या जागेवरील अतिक्रमण काढून घेण्यात यावे या मागणीसाठी एका व्यक्तीने गुरुवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. यामध्ये तौसिफ़ हमीद शेख (रा.कर्जत)हि व्यक्ती गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(Video..)

दरम्यान सादर व्यक्तीने अतिक्रमण हटवण्यात यावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. गुरुवार रोजी दुपारी ३ च्या सुमारास तौसिफ़ शेख यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले व स्वतःला पेटवून घेतले. यावेळी पत्रकार उमेश दारुणकार यांनी संबंधित व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न केला. पंरतु या अपघातात शेख गंभीररित्या भाजले आहे. शेख यांना तातडीने जिल्हा रुग्णायालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अचानक घडलेल्या घटनेने परिसरात उपस्थितांमध्ये मोठी धावपळ झाली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!