Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

कलेक्टरांसह इतरांवर गुन्हा नोंदवा

Share

श्याम आसावा यांची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- पालकमंत्र्यांच्या कर्जत मतदार संघातील दावल मलिक ट्रस्टच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याने तौसिफ शेख यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याचा दुर्दैवी व विदारक प्रकार घडला. त्यात शेख यांचा मृत्यू झाल्याने कलेक्टर आणि संबंधित अधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्याम असावा यांनी एसपींकडे केली आहे.

20 ऑगस्टला तौसिफ जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणास बसले होते. 4 सप्टेंबर, 10 डिसेंबर व त्यानंतर 20 डिसेंबरला असे वारंवार आत्मदहनाचा इशारा देवूनही प्रशासन निद्रीस्त राहिले. घटना घडत असताना शासकीय अधिकारी यांनी तौसिफ यास परावृत्त करण्याकरिता प्रयत्न केले नाही. पत्रकार उमेश दारुणकर व गर्दी जमलेली असताना काही मोजक्या लोकांनी शेख यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. एकीकडे संवेदना बधीर झालेले प्रशासन असताना पत्रकार दारूणकरसारख्यांच्या संवेदना जागरुत असल्याचे यातून दिसले. काल घटना घडल्यावर अहमदनगर महानगर पालिका हद्दीतील सिना नदीतील अतिक्रमण काढणारे जिल्हाधिकारी यांना जाणिव झाली की ते केवळ अहमदनगर महानगर पालिकेचे आयुक्त नसुन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत.

तीन दिवसांपूर्वीच त्यांच्याच आदेशाने आयकॉन शाळेचे अतिक्रमण काढण्यात आले. या शाळेने महानगर पालिका निवडणुकी दरम्यान जिल्हाधिकार्‍यांना शाळा चालु असताना शाळेच्या आवारात येण्यास मज्जाव केला होता. त्यानंतर शाळेचे अतिक्रमण पाडले. जरी दोन्ही घटनांचा परस्पर संबंध नसला तरी शाळेचे अतिक्रमण कधी लक्षात आले व कारवाई कधी झाली हा प्रश्न अनुत्तरित राहतो.

आजही मार्केट यार्ड चोैकातील पुणे हायवेवर तीन मजली अतिक्रमण डौलात उभेे आहे. तसेच शहरात कधीतरी फ्लेक्स काढण्याचा स्टंट अधुन मधुन होत असतो. याच चौकातील बाजार समितीचे प्रवेशद्वारावर पंडीत नेहरू यांच्या पुतळ्यासमोरच मोठे फ्लेक्स लावणारे प्रस्थापित सत्ताधारी आमदारांची प्रतीमेसह लावलेली फलक काढण्याचे धाडस न दाखवता प्रशासन मात्र शेपटी घालून बसल्याचे दिसते.

जिल्हाधिकारी यांना ही घटना घडण्यापूर्वी केवळ ते अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त असल्याचा समज झाल्याने पालिकाहद्दीतील गैरकारभार बाबत या ठिकाणी संदर्भ आसावा यांनी नमुद केला आहे.
तौसिफ यांच्या मागण्यांकडे जिल्हाधिकार्‍यांसह इतर अधिकार्‍यांनी दुर्लक्ष करुन त्यांचा मानसिक छळ केला आहे. त्यांना आत्मदहन करण्यास भाग पाडणार्‍या सर्वांवर गुन्हा दाखल नोंदवा अशी मागणी आसावा यांनी केली आहे.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!