Type to search

Breaking News आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणारे शेख यांचा उपचारादरम्यान मृत्यू

Share

सार्वमत ऑनलाईन
अहमदनगर (प्रतिनिधी) – कर्जत येथील दर्ग्याच्या जागेतील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी तौसिफ़ शेख या इसमाने गुरुवार दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःला पेटून घेतले. या अपघातात ते ७० टक्के भाजले होते. त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु शेख हे गंभीर रित्या भाजले असल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

ग्रामस्थांकडून कर्जत बंदची हाक
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःला पेटवून घेतलेले तोसिफ शेख यांचा पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यूझाला. या घटनेचे तीव्र पडसाद कर्जत मध्ये उमटले असून कर्जत मध्ये आज सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. शहरात विविध ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुस्लिम संघटनानी बंदची हाक दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!