Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

रानडुकराच्या हल्ल्यात १ जण गंभीर जखमी

Share

जामखेड (प्रतिनिधी) – शेतात गुरे चारण्यासाठी गेलेल्या प्रल्हाद वराट यांच्यावर रानडुकरांनी हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. हि घटना तालुक्यातील साकत येथे घडली. दरम्यान वराट यांना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अनेक दिवसांपासून साकत व परिसरात रानडुक्करांच्या उपद्रवाने नागरिक त्रस्त आहेत. परिसरात मोठय़ा प्रमाणावर दुष्काळी परिस्थिती आहे. रानडुकरे पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान करतात. आता तर थेट जीवघेणा हल्ला करीत आहेत. यामुळे रानडुकरांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!