अहमदनगर : ‘आयर्नमॅन’ पदवी मिळाल्याबद्दल आय जी कृष्णप्रकाश यांचा सत्कार 

0

अहमदनगर – नगरचे मा. जिल्हा पोलीस अधीक्षक व सध्याचे आय. जी. कृष्णप्रकाश यांना फ्रान्सला आयर्नमॅन पदवी मिळाल्याबद्दल नगरमध्ये केअर फॉर यू फौन्डेशनचे मधुसूदन सारडा व सी. ए. असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद भंडारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी सी. ए. पायल सारडा-राठी ,रवींद्र गुजराथी ,लक्ष्मीकांत झंवर , सुमतीलाल कोठारी , विष्णुशेठ  सारडा ,डॉ. अजय कोठारी ,लक्ष्मीनिवास सारडा ,समीर सोनी , संजय  सारडा, अविनाश बिहानी , मुरलीधर बिहाणी ,सी. ए. रोशन राठी , स्मिता घेसास , स्नेहा खिस्ती , पवन खंडेलवाल , अमित बोरा , सी ए उमेश दोडेजा , पवन गांधी , अभिषेक जोशी , कैवल्य यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

वर्ल्ड  ट्रफथोय कार्पोरेशनच्या वतीने फ्रान्स मध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत १७ तासात सायकलींग, रनिंग व पोहणे हे अंतर पार कारवायांचे उद्दिष्ट होते ते कृष्णप्रकाश यांनी १४ तासात पूर्ण केले त्याबद्दल त्यांना आयर्नमॅन हि पदवी भेटली.

 

LEAVE A REPLY

*