डॉक्टरांचा निष्काळजीपणा, गरोदर महिलेचे प्रसृतीपूर्वीच निधन

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगरमधील बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रविवारी सकाळी श्रावणी रवी निकम (वय 19) या महिलेचा प्रसृती पूर्वीच मृत्यू झाला.

तीन दिवसांपूर्वी श्रावणीला प्रसृतीसाठी देशपांडे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री प्रसृतीपूर्व कळा येत असतांना डॉक्टरांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने रविवारी सकाळी श्रावणी आणि तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला. घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी देशपांडे रुग्णालयात गोंधळ घातला. या प्रकरणी पोलिसात फिर्याद देण्याची कार्यवाही सुरू होती.

वर्षभरापूर्वी श्रावणीचा विवाह नाशिक येथील रवी निकम यांच्याशी झाला होता. त्यानंतर श्रावणी गरोदर असल्याने तिला माहेरी नगरला बाळासाहेब देशपांडे रुगणलयात तीन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री प्रसृतीपूर्व कळा येवूनही डॉक्टरांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

रविवारी सकाळी 9 वाजता श्रावणीला अचानक त्रास होऊ लागला.

मात्र, त्यावेळी डॉक्टर वेळेवर उपलब्ध नव्हते. यामुळे प्रसृतीपूर्वीच श्रावणीचा मृत्यु झाला. त्यानंतर उशीराने आलेल्या डॉक्टरांनी रुग्णालयात अतिदक्षता विभाग (आयसीयुची) सोय नसल्याने खासगी रुग्णालयात हलविण्यास सांगितले. श्रावणीच्या नातेवाईकांनी तिला सावेडी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये नेले असता, ती मृत असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.

यामुळे संतप्त झालेल्या श्रावणीच्या नातेवाईकांनी देशपांडे हॉस्पिटलमध्ये गोंधळ केला. तेथे ताबडतोब पोलीस फाटा नेत डॉक्टर ठोकळ यांना ताब्यात घेण्यात आले. कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मयताच्या नातेवाईकांच्या मागणीनुसार श्रावणीचा मृतदेह शवच्छिदेनासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालय येथे नेण्यात येणार आहे. मयत श्रावणी ही तीन वर्षाची असतांना तिचे वडील मयत झाले होते. तेव्हापासून तिला नगरमधील पत्रकार राजेश सटाणकर यांनी लहानचे मोठे करत लग्न लावून दिले होते.

LEAVE A REPLY

*