Type to search

अवजड दुखणं..

आवर्जून वाचाच सार्वमत

अवजड दुखणं..

Share
केडगाव अपघात : दोन तासांत दोघांचा बळी
अहमदनगर (प्रतिनिधी) – खड्ड्यांची चाळणी झालेल्या बायपास रस्त्यावरील अजवड वाहतूक जीवघेणी ठरू पाहत आहे. शहरात घुसलेल्या जडवाहतुकीने केडगावमध्ये तीन तासात दोघांचा बळी घेतला. जड वाहतुकीने चिरडल्याने दोन स्वतंत्र अपघातात दोघांना जीव गमावावा लागला. दरम्यान बाह्यवळण दुरुस्तीसाठी सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात आल्याने आजपासून जडवाहतूक शहरातून बंद करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज (गुरूवारी) पहाटेच्या सुमारास अन् भल्या सकाळी हे अपघात झाले.

कल्याण विठोबा अनभुले (वय 61) व अनामिका अविनाश गायकवाड (वय 21) अशी ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. केडगाव वेशीसमोर जड वाहनाने धडक दिल्याने अनभुले जागीच ठार झाले. या अपघाताला तीन तास लोटत नाहीत तोच सकाळी साडेसातच्या सुमारास अनामिका अविनाश गायकवाड (वय 21) या तरुणीला अंबिकानगर बसस्थानका शेजारी जड वाहनाने चिरडले. ..त्यात ती जागेवरच गतप्राण झाली. दरम्यान हि घटना घडल्यानंतर केडगाव मधील जमाव घटनास्थळी जमा झाला. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी नगर-पुणे मार्गावर ठिय्या देत रास्ता रोको सुरु केला. यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्ण ठप्प झाली. जोपर्यंत जडवाहतूक शहरातून बंद होत नाही तोपर्यंत आम्ही जाग्यावरून उठणार नसल्याची भूमिका आंदोलकांन घेतल्याने आंदोलन चिघळले. संतप्त नागरिक यात सहभागी झाले.

कोतवालीचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे व वाहतूक निरीक्षक अविनाश मोरे यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेऊन त्यांशी चर्चा केली. मात्र जोपर्यंत बाह्यवळण रस्ता सुरु होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही या भूमिकेवर आंदोलनकर्ते ठाम होते. त्यामुळं पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याशी मोबाईलवर चर्चा करण्यात आली. आजपासून शहर हद्दीतून जडवाहतूक वाहतुकीस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात नगरसेवक दिलीप सातपुते, माजी नगरसेवक अंबादास गारुडकर, शिवाजी लोंढे, संजय लोंढे, मनोज कोतकर, भूषण गुंड, अमोल येवले, हर्षवर्धन कोतकर, विजय पठारे आदी सहभागी झाले होते. दरम्यान पहाटे अपघातात मरण पावलेले अनभुले सेवानिवृत्त बांधकाम विभागातील कर्मचारी होते. तर अनामिका हि पुण्यात केंद्रीय विद्यालयात शिकत होती.ती नगरमध्ये क्लास साठी चालली होती.
………….

उद्याच सर्वपक्षीय बैठक
बाह्यवळण खराब असल्याने सर्व जड वाहतूक शहरातून जाते. यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे.जोपर्यंत बाह्यवळण मार्ग वाहतुकीस खुला होत नाही तोपर्यंत असे अपघात होतच राहणार. यामुळे हा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी उद्या (शुक्रवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वपक्षीय बैठक घेण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!