4 हजार खरेदीखताचे भवितव्य धोक्यात

0

तुकडे बंदी-तुकडे जोड कायद्याचा भंग

अहमदनगर (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने लागू केलेल्या तुकडे बंदी व तुकडे जोड कायद्याचा जिल्ह्यातील दुय्यम निबंधक आणि सर्कल यांनी भंग केला आहे.
हा कायदा पायदळी तुडवत जिल्ह्यातील दुय्यम निबंधक आणि सर्कल यांनी 3 हजार 923 खरेदीखत मंजूर करत त्यांच्या नोंदीही कायम केल्या आहेत. यामुळे तुकडेबंदी व तुकडेजोड कायद्याचा भंग होण्यासोबतच सरकारचा महसूलही बुडला आहे. याबाबत तक्रार होऊन महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दोषींवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत.
केंद्र सरकारने शेतीचे वाढते तुकडीकरण थांबवण्यासाठी तुकडेबंदी व तुकडेजोड कायदा लागू केला. या कायद्यानुसार 20 गुंठ्याच्या आतील शेतजमिनी विक्रीवर बंदी घालण्यात आली. मात्र, असे असताना जिल्ह्यात महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी 20 गुंठ्याच्या आतील 3 हजार 923 खरेदीखत मंजूर करत त्यांच्या नोंदीही कायम केल्या आहेत.
याबाबत नोव्हेंबर 2015 ला राज्य सरकारकडे तक्रार होवून चौकशीची मागणी झाली. त्यानंतर महसूल विभागाच्या सचिवांनी जानेवारी 2016 तत्कालीन जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या प्रकारामुळे शासनाची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट झाली असून यामुळे संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून शासनाचा बुडालेला महसूल वसूल करण्याची मागणी होत आहे.

तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी केलेल्या चौकशीत नगर 279, अकोले 8, श्रीरामपूर 480, संगमनेर 328, राहुरी 188, राहाता 40, नेवासा 619, कोपरगाव 193, कर्जत 28, श्रीगोंदा 270, शेवगाव 384, पाथर्डी 342, पारनेर 462 आणि जामखेडमध्ये 302 असे एकूण 3 हजार 923 खरेदीखत हे नियमबाह्य असल्याचा अहवाल तहसीलदारांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेला आहे. तुकडे बंदी व तुकडे जोड कायद्यातील 20 गुंठे पेक्षा कमी क्षेत्र असणार्‍या जमीनीच्या मिळकतींचा तपशील व फेरफार मंजुर करणार्‍या अधिकार्‍यांच्या नावाचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात आलेला आहे. हे नियमबाह्य खरेदीखते हे मे 2014 ते जुलै 2016 या दोन वर्षातील आहेत.

LEAVE A REPLY

*