गिरवले कुटुंबियांचे हायकोर्टात पिटीशन

0

मामांच्या मृत्यूला जबाबदार असणार्‍यांवऱ कारवाईची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगरसेवक कैलासमामा गिरवले यांच्या मृत्यू प्रकरणाचा गुन्हा दाखल करून आरोपींवर कारवाई करावी, या मागणीसाठी मामांच्या पत्नी निर्मला यांनी औरंगाबाद हायकोर्टात पिटीशन दाखल केली आहे. पिटीशनमध्ये सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. कोर्टाने सीआयडी व इतर चौघांना नोटिसाही बजावल्या आहेत.

एसपी ऑफीस तोडफोड प्रकरणात कैलासमामांना नगर एलसीबीने अटक केली होती. पोलिस कोठडीत असताना मामांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला पोलिस जबाबदार असल्याचा आरोप गिरवले कुटुंबियांनी केला. मामांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी सुरू आहे. मामांचे बंधू बाबासाहेब गिरवले यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात मारहाणीचा तक्रार अर्ज दिला होता. वेळेत उपचार मिळू न शकल्याने मामांचा 16 एप्रिल 2018 रोजी मृत्यू झाला. बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल न करता केवळ तक्रार अर्ज घेतला. पोलिसांच्या मारहाणीतच मामांचा मृत्यू झाला. त्यामुळे गुन्हा दाखल करून आरोपी असलेल्या पोलिसावर कारवाई करावी, अशी मागणी निर्मला गिरवले यांनी पिटीशनमध्ये केली आहे. तसंच सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. अ‍ॅड. नितीन गवारे यांच्यामार्फत हे पीटीशन दाखल करण्यात आले.

LEAVE A REPLY

*