Type to search

Breaking News मुख्य बातम्या सार्वमत

अहमदनगर : अपहरण झालेल्या तरूणीची ग्रामस्थांनी केली सुटका; धक्कादायक माहिती उघड

Share
भगतसिंग चौकातील मारहाण प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल, Latest News Bhagatsing Chowk Fight Action Shrirampur

अहमदनगर : गुरुवारी अपहरण करून विळद परिसरात रेल्वे रुळावर हातपाय बांधून टाकलेल्या तरूणी विषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पिडीत तरुणीवर दोन वर्षांपूर्वी अत्याचार झाला होता. या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात तिने फिर्याद दाखल केली होती.

यात १३ जणांवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच कारणातून गुन्हातील आरोपींनी तिचे अपहरण करून मारून टाकण्याचा प्रयत्न केला. याबाबत तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दरम्यान विळद परिसरात रेल्वे रुळावर गुरुवारी सायंकाळी पोत्यात एक तरूणी जखमी व बांधून टाकलेल्या अवस्थेत आढळून आली. हा प्रकार स्थानिक ग्रामस्थांनी पोलीसांना सांगितला. तरुणीची ग्रामस्थांनी पोत्यातून सुटका केल्यानंतर तरुणीने याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दिलेल्या फिर्यादीवरून तुषार अर्जुन वाघ, बंडू हिराजी मतकर, सुभाष कराळे, अर्जुन वाघ, अरुण मतकर, दिलीप नगरे (सर्व रा. जवखेडे खालसा ता. जामखेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!