Type to search

आवर्जून वाचाच सार्वमत

खासदार भोई

Share
‘अर्बनच्या बाप्पांची वाहिली पालखी
अहमदनगर (प्रतिनिधी) – शतक महोत्सव पार पाडून 108 वर्षात पदार्पण केलेल्या नगर अर्बन मल्टिस्टेट बँकेच्या गणेशोत्सवास सकाळच्या मंगलमय वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला. दिल्लीगेट येथील बँकेच्या चौपाटी कारंजा शाखेपासून निघालेल्या शिस्तबद्ध मिरवणुकीत सजवलेल्या रथामधून ‘श्रीं’ची मूर्ती विराजमान करण्यात आली. तर पालखीमध्ये छोटे श्रीगणेश होते. नगरमधील प्रसिद्ध तालयोगी ढोल पथकाच्या ठेक्यावर ही मिरवणुक मार्गस्थ होत होती. मिरवणुकीच्या प्रारंभी सनई चौघाडा वाजत होता. भालदार-चोपदार, मावळे, पुजारींचे वेषभूषा केलेले कर्मचारी यावेळी मिरवणुकीत सहभागी झाले होते. बँकेचे चेअरमन खा.दिलीप गांधी हे स्वत: श्रीगणेशाच्या पालखीचे भोई झाले.

यावेळी व्हाईस चेअरमन नवनीन सुरपुरिया, संचालक विजय मंडलेचा, किशोर बोरा, अजय बोरा, शैलेश मुनोत, मनेष साठे, मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन गांधी, प्रमुख व्यवस्थापक सतीश शिंगटे, सहप्रमुख व्यवस्थापक सतीश रोकडे, महादेव सावळे, मुख्य शाखाधिकारी हेमंत बल्लाळ, प्रविण सांगळे आदिंसह बँकेचे कर्मचारी पारंपारिक वेशभुषेत सहभागी झाले होते.

तालयोगी ढोल पथकाच्या ठेक्यावर ही मिरवणुक दिल्लीगेट, चितळरोड, नेता सुभाष चौक, तेलीखुंट, कापडबाजार, भिंगारवाला चौक मार्गे ही मिरवणुक अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालयात पोहचली. या ठिकाणी बँकेचे उपाध्यक्ष नवनीत सुरपुरिया व सीईओ नवीन गांधी यांच्या हस्ते षङोपचाराने विधीवत ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 10 दिवस गणेशोत्सवानिमित्त बँकेच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!