चार दिवस आव्वाज

0
लाऊड स्पीकरला बारापर्यंत परवानगी
अहमदनगर (प्रतिनिधी) – गणेशोत्सवात काळात चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत फुल टू धम्माल करता येणार आहे. जिल्हा प्रशासनाने 14, 17, 22 व 23 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत ‘आव्वाज’ची परमिशन दिली आहे. गुरूवारी (दि. 13) भक्तांचे लाडके बाप्पाचे वाजत गाजत घरोघरी आगमन होणार आहे. यंदा अकराव्या दिवशी गणेशाचे विजर्सन होणार आहे. यंदा गणपती व मोहरम हे एकत्र आले. त्यामुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.

गणेशोत्सव काळात शहरात अनेक ठिकाणी मोठे देखावे उभारले जातात. अनेक मंडळे स्पिकर लावून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. स्पिकरच्या आवाजाचा नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून न्यायालयाने आवाजावर बंधने घातली आहे. सार्वजनिक ठिकाणी रात्री 10 वाजेपर्यंत स्पिकर वाजविण्यास परवागी आहे. तर उत्सावाच्या काळात वेळेची मर्यादा वाढविण्याचा अधिकार जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहे.

कलेक्टरांनी वर्षातील 15 दिवस सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत वेळेची मर्यादा वाढून देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन, या दोन दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत वेळ वाढून देण्यात आली होती. त्यानंतर आता गणेशोत्सवातील दुसरा दिवस दिवस (दि.14), पाचवा दिवस(दि.17), दहावा दिवस (दि.22), व अनंत चतुदर्शी (दि.23) या चार दिवशी प्रशासानाने रात्री 12 वाजेपर्यंत विहीत आवाजाच्या डेसिबलमध्ये स्पिकर वाजविण्यास मुभा दिली आहे.

LEAVE A REPLY

*