Type to search

Breaking News मुख्य बातम्या सार्वमत

नगर : फर्निचर दुकानाला लागलेल्या आगीमध्ये 70 लाखांचे नुकसान

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – फर्निचरच्या दुकानाला लागलेल्या आगीत सुमारे 70 लाख रुपये किंमतीचे साहित्य जळून खाक झाले. गुरूवारी (दि. 21) पहाटे साडेपाचच्या सुमारास बालिकाश्रम रस्त्यावर ही घटना घडली.

राजू म्याना यांचे बालिकाश्रम रोडवर न्यू स्टाईल नावाचे फर्निचरचे दुकान आहे. या दुकानात लाकडी फर्निचर, स्टीलचे कपाटे, बेडसह विविध फर्निचरच्या वस्तू होत्या. पहाटे साडेपाचच्या सुमारास या दुकानातून आगीचे लोळ बाहेर पडत असल्याचे स्थानिक नागरिकांना दिसले. नागरिकांनी तत्काळ अग्निशामक दलाला माहिती कळविली. महापालिका, एमआयडीसीच्या अग्निशामक दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. पाण्याचा मारा करून ही आग विझविण्यात आली.

मात्र तोपर्यंत दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले होते. सुमारे 50 लाख रुपयांचे फर्निचर जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दुकान मालक राजू म्याना यांनी मात्र सुमारे 70 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!