Type to search

Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

पारनेरातील गुणोरेत सामूहिक आत्महत्या

Share
चामरलेणीला युवकाचा मृतदेह आढळला latest-news-nashik-found-body-of-young-man-at-chamarleni

शेतकरी दाम्पत्याने मुलांसह स्वतःला संपविले

अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील गुणोरे येथील एकाच शेतकरी कुटुंबातील चार जणांनी राहत्या घरामध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली.

बाबाजी विठ्ठल बढे (वय 37), पत्नी कविता बढे (वय- 35), मुलगा आदित्य (15) आणि धनंजय (12) असे मृत झालेल्या चौघांची नावे आहेत. हे चारही जण घरात गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत सोमवारी सकाळी आढळून आले. घरातील लोखंडी पाईपला दोरी बांधून त्यांनी आत्महत्या केली.

म्हसे खुर्द रस्त्याच्याकडेला त्यांचे घर आहे. सोमवारी सकाळी रस्त्याने ये-जा करणार्‍यांना बढे यांच्या गोठ्यातील जनावरांचा हंबरडा ऐकू आला. वाटसरूंनी घराकडे वळत पहाणी केली असता दरवाजा, खिडक्या बंद दिसल्या. खिडकीतून डोकावले असता मृतदेह दिसून आले. बढे यांना सहा एकर शेती होती. पशुपालन करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. बाबाजी यांची पत्नी कविता या मानसिक आजारी होत्या तर आदित्य हा दिव्यांग होता. सातवीत शिकणारा धनंजय शाळेत अतिशय हुशार होता. आत्महत्या कोणत्या कारणांमुळे केली याविषयी अद्याप माहिती मिळाली नाही. शेतकरी बाबाजी बढे यांनी पत्नी आणि मुलांचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!