फिरोदिया शिवाजीयन्सच्या खेळाडूंना पुण्यात विशेष प्रशिक्षण

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या फिरोदिया शिवाजीयन्स आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेतून 48 खेळाडूंची पुण्यातील लिव्हरपूल शिवाजीयन्स ऍकॅडमी(लोणी) येथील तीन दिवसीय विशेष प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. या ऍकॅडमीतील तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ नगरमधील या खेळाडूंना मिळणार आहे. प्रशिक्षणासाठी हे खेळाडू शुक्रवारी (दि.9) पुण्याला रवाना झाल्याची माहिती शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशनचे नरेंद्र फिरोदिया यांनी दिली.

नगरमधील उदयोन्मुख खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी नरेंद्र फिरोदिया यांच्या विशेष प्रयत्नातून फौंडेशनने प्रसिध्द शिवाजीयन्स क्लबबरोबर टायअप केले आहे. या उपक्रमामुळे नगरमध्ये फुटबॉल खेळाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. फिरोदिया शिवाजीयन्सच्या माध्यमातून नुकत्याच घेण्यात आलेल्या आंतरशालेय स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेतून 14 व 16 वर्षे वयोगटातील 48 खेळाडूंना पुण्यात विशेष प्रशिक्षणाची संधी मिळाली आहे. लिव्हरपूल शिवाजीयन्समधील व्यावसायिक प्रशिक्षक या खेळाडूंना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती शिवाजीयन्स क्लबचे अध्यक्ष मनोज वाळवेकर यांनी दिली.
नगरमध्ये मुख्य प्रशिक्षक व्हिक्टर जोसेफ यांच्या मार्गदर्शनाखाली फिरोदिया शिवाजीयन्सचे खेळाडू प्रशिक्षण घेत असतात. नगरचे राष्ट्रीय फुटबॉलपटू झेव्हियर स्वामी, ज्युनियर नॅशनल खेळाडू सचिन पाथरे, राजेश अँथनी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत अनेक खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. फिरोदिया शिवाजीयन्सचे समन्वयक म्हणून अमित झिरपे, पल्लवी सैदाणे, उपेंद्र गोलांडे काम पाहत आहेत. पुण्याला जाणार्‍या खेळाडूंसमवेत सचिन पाथरे व पल्लवी सैदाणे असणार आहेत.

 

नगरमधील उदयोन्मुख खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळावे फौंडेशनने शिवाजीयन्स क्लबबरोबर टायअप केले आहे. या उपक्रमामुळे फुटबॉल खेळाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.
– नरेंद्र फिरोदिया

LEAVE A REPLY

*