दंडीयाच्या वादातून तलवार हल्ला

0

कल्याण रोडवरील घटना : दोन युवक गंभीर जखमी

अहमदनगर (प्रतिनिधी)– नवरात्रौत्सवात दांडीया खेळण्याच्या कारणावरून दोन तरूणांवर तलवार व चॉपरने हल्ला चढविल्याची घटना नगर कल्याण रोडवरील बालाजी मंदिरसमोर घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात अंकुश लक्ष्मण साबळे हा गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.

अंकुश लक्ष्मण साबळे (वय 25, रा.शिवाजीनगर) हे स्वप्निल दीपक गडाख मित्रासमवेत शनिवारी रात्री कल्याण रोडवरील बालाजी मंदिर समोर बसले होते. दांडीया खेळण्याचे कारण पुढे करत योगेश गझल्ली, सुमित इपलपेल्ली, अक्षय वलकाट्ी, सचिन वाळके उर्फ जॅक्सन, सुनिल जाधव उर्फ दाद्या, निल गांधी, श्रीकांत येनगुपटला, व इतर 3 ते 4 अनोळखी तरुणांनी तलवार, चॉपर लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच 3 हजार 500 रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली.

LEAVE A REPLY

*