VIDEOS: Photogallery: नगर जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या संपास उत्स्फूर्त प्रतिसाद

0
नगर जिल्ह्यातून शेतकरी संपला सुरुवात झाली आहे.

टाकळीभान येथील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी राज्य मार्ग 44 वर दुध ओतुन शेतकरी संपात सहभाग नोंदवुन राज्य शासनाच्या निषेधाच्या घोषना दिल्या.

कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथिल शेतकरी आजपासुन संपात सहभागी होत जोपर्यंत शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देऊन ७/१२ चा उतारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीची अमंलबजावणी करावी, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दिडपट हमीभाव मिळावा,शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा, ६० वर्षावरील शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागु करावी, दुधाला प्रतिलिटर ५० रुपाये भाव मिळावा तसेच शेतीसाठी अखंडित विजपुरवठा मिळावा आदी मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत दुध, भाजीपाला, शेती माल बाजारात विक्री करणार नसल्याचा निर्धार यावेळी शेतकर्‍यांनी व्यक्त करत संपात सहभागी होत आहे.

तसेच भाजपा नेते माधव भंडारी यांनी शेतकर्‍यांच्या संपाबाबत केलेल्या वक्तव्याचा यावेळी निषेध करण्यात आला.

राहाता तालुक्यात शेतकरी संपास सुरूवात झाली असून येथील शेतकऱ्यांनी दुध काढले पन डेअरीला न घालण्याचा निर्णय घेतला आहे तसेच सर्व खाजगी दुध डेअऱ्या बंद आणि  भाजीपाला मार्केटला न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

या संपात सर्व गावा गावातील शेतकरी एकवटला आहे. शिर्डीत संतप्त शेतकऱ्यांनी दुधाचा टँकर रस्त्यावर सोडून हजारो लिटर दुध फेकले. श्रीगोंदा येथील घारगाव ,हंगेवाड़ी मध्ये दूध रस्त्यावर ओतले, अकोले येथील आठवडे बाजार कडकडीत बंद. शेतकरी उस्फुर्तपणे संपात सहभागी होत आहेत.बाजार समिती मधील व्यापारी,हमाल मापाडी यांनी संपाला पाठींबा दर्शविला आहे.

नाटेगावच्या शेतकर्यांनी नगर मनमाड रस्त्यावर तिव्र आंदोलन केले

अकोले संगमनेर रस्त्यावरील सुगाव फाट्यावर शेतकऱ्यांचा रस्ता रोको सुरु आहे.
राहाता शहरात व परिसरात शेतकरी संपास उस्त्पुर्त प्रतीसाद मिळत आहे. त्याचा आठवडे बाजार बंद, बाजार समीती बंद, सर्व दुध डेअऱ्या बंद.

राहाता बाजारतळावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

राहुरीत दुधाचा टेम्पो आदळून दूध रस्त्यावर ओतले.

टाकळी खातगाव सर्व शोतकरी भाजीपाला व दुध ओतून संपावर गेले आहे.

सोनईकरांनी 100% बंद पाळून शेतकरी संपाला दिला पाठिंबा.

पुणतांब्यात भव्य रैली व भजन सुरू.

लोणीत शेतकरी संपाला कृषी सेवा केंद्र चालकांचा पाठींबा, कृषी सेवा  केंद्र ठेवले बंद.

श्रीगोंदा : कांदा गाडी अडून शनि चौक येथे कांदा ग़ोण्या रस्त्यावर ओतल्या, त्यानंतर हाच कांदा पुन्हा आदिवासी समाजाच्या लोकांनी गोळा केला, रस्त्यावर टाकलेल्या कांदा मुळे दुचाकी गाड्या घसरल्या.

कोपरगाव तालुक्यातील झगडेफाटा येथे शेतकऱ्यांनी आपले दुध व कांदा रोड वर ओतून देत सरकारचा निषेध व्यक्त केला.

मढी खुर्द येथे नाशिक शिर्डी रोडवर बाजारात चाललेला आंबा व सफरचंदाच्या गाड्या संतप्त शेतकऱ्यांनी आडवल्या.

अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर येथे शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकला….

व्हीडीओ पाहण्यासाठी खाली लिंकवर कीलक करा : 

शिर्डीत संतप्त शेतकऱ्यांनी दुधाचा टँकर रस्त्यावर सोडून हजारो लिटर दुध फेकले

नगर जिल्ह्यातून शेतकरी संपाला सुरुवात

मढी खुर्द येथे नाशिक शिर्डी रोडवर संतप्त शेतकऱ्यांनी गाड्या आडवल्या

 

 

LEAVE A REPLY

*