अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा

0

राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे.

संपाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील बहुतांश भागातील कृषी सेवाही विस्कळीत झाली. राज्यातील अनेक बाजारपेठांमध्ये शेतमालाची आवक पूर्णपणे थंडावली होती.

बाजार समित्यांमधील लिलाव गुरुवारी बंद होते.

शेतमाल आणि दुधाची वाहतूक करणारी वाहने महामार्गावरच अनेक ठिकाणी अडवण्यात आल्याने शहरात जाणारा भाजीपाला आणि दूध रोखून धरण्यात आले.

या संपास राज्याच्या सर्व भागांत मोठा प्रतिसाद मिळाला असला तरी नगर जिल्हय़ात या आंदोलनाचा जोर मोठा होता.

संपकरी शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?

  • शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा
  • स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा
  • शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागू करावी
  • शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा
  • शेतीसाठी अखंडित वीजपुरवठा करावा

LIVE: 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा जाहीर केला आहे

मुख्यमंत्र्याच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना परमेश्वराने सद्बुद्धी देवो यासाठी पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी चौकात सभा घेतली

जवळ्के येथे रत्यावर दूध ओतून सरकारविरुद्ध निषेधाच्या घोषणा

कोपरगाव तालुक्यातील शिर्डी – लासलगाव मार्गावर शेतकरी दुसर्‍या दिवशीही रस्त्यावर उतरुन धामोरी फाटा येथे संप चालु ठेवत कांदे घेउन जाणार्‍या दोन गाड्या  व  गहु घेउन जाणारी एक ट्रक आडवली

पोहेगाव आज बंद शेतकरी संपला पाठिंबा शेतीमाल घेऊन जाणाऱ्या गाड्या आडविल्या

पुणतांब्यात शेतकऱ्याचा निषेध मोर्चा काढण्यात आला.

आज गारखिंडी ग्रामस्थांनी रास्तारोको करून निषेध व्यक्त करण्यात आला.

राहाता व साकुरी शहर कडकडीत बंद ठेवून शेतकरी संपास पाठींबा व्यापारी असोशिएशनने शेतकरी संपास पाठींबा दिला.

दुसऱ्या दिवशीही राहाता परिसरात दुध संकलन बंद, लाखो लिटर दुध पडून बाजार समीतीतही शुकशूकाट

 

LEAVE A REPLY

*