अहमदनगर : निंबळक बायपासवरील खड्ड्यांसाठी फेसबुक लाइव्ह आंदोलनास सुरुवात

0

अहमदनगरयेथील खड्डेमय झालेल्या निंबळक बायपासबाबत नगरमधील तरुणांनी एकत्र येत फेसबुक लाइव्ह आंदोलन सुरु केले

अहमदनगर- मनमाड हायवेवरील विळद येथील बायपास येथून हे आंदोलन सुरु करण्यात आले असून निंबळक चौकामार्गे कल्याण महामार्गावर आंदोलनाची सांगता करण्यात येणार आहे.

या आंदोलनाच्या माध्यमातून खड्डेमय झालेला बायपास त्वरीत दुरुस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.

नगर शहरातील युवकांनी एकत्र येत हे लाइव्ह आंदोलन सकाळी 11.15 वाजण्याच्या सुमारास सुरु केले. प्रत्येक युवकाच्या फेसबुक पेजवरुन हे आंदोलन लाइव्ह केले जात आहे. लाइव्हच्या माध्यमातून रस्त्याची दुरवस्था सरकारला दाखविण्याचा युवकांचा प्रयत्न आहे.

बायपासबाबत वेळोवेळी आंदोलन करुनही सरकार दखल घेत नाही. त्यामुळे अवजड वाहने नगर शहरातून जात असल्याने अपघात होत आहेत. बायपास दुरुस्त झाल्यास अवजड वाहने शहरातून जाणार नाहीत. पर्यायाने शहरामध्येही वाहतूक कोंडी होणार नाही. बायपासवरील खड्ड्यामुळे सातत्याने अपघात होत आहेत. अनेकांना जीवही गमवावा लागत आहे.

सरकारला जाग येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनाही या लाइव्ह आंदोलनातून टॅग करणार आहे.

 

LEAVE A REPLY

*