Type to search

Breaking News आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

सुसाट मद्यधुंद कंटेनर चालकाने उडवल्या दहा गाड्या

Share
अहमदनगर – एका कंटेनर चालकाने बोलेगाव फाटा येथून ते प्रेमदान चौकापर्यंत आठ ते दहा गाड्यांना उडविले. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री पावणे अकरा ते अकरा च्या दरम्यान हा थरार घडला. सुसाट सुटलेल्या टँकरचालकांना तोफखाना पोलिसांनी प्रेमदान चौकात अडवून ताब्यात घेतले. हे कृत्य त्याने कोणत्या कारणामुळे केले याची चौकशी पोलिस करत आहेत.

नागापूर एमआयडीसीतील सह्याद्री चौक ते प्रेमदान चौक या जवळपास सात किलोमीटर अंतराच्या दरम्यान नशेत धुंद असलेल्या चालकाने कंटनेर चालवला. प्रेमदान चौकात कंटनेर थांबविल्यानंतर चालकाने तेथून पळ काढला. मात्र, नागरिकांनी क्लिनरला पकडून तोफखाना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

पोलीस या घटनेची माहिती घेत असून नेमकी किती वाहनांना या कंटनेर ने धडक दिली किंवा यात कोणी जखमी आहेत का? याची माहिती घेत आहेत. रात्री अकरा नंतर ही घटना घडल्याने आणि थंडी असल्याने रस्त्यावर जास्त वर्दळ नसल्याने अनेकांचे प्राण वाचले असे म्हणावे लागेल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!