अहमदनगर : फटक्यांचे मार्केट सजले

0

अहमदनगर : दिवाळीसाठी नगरची फटाका बाजार सज्ज झाली आहे. सर्वत्र प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची चर्चा सुरू असतांनाच यंदा फटाक्यांच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. दिवाळीपूर्वीच राजकीय फटाकेबाजी सुरू झाल्याचाही परिणाम जाणवतो आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा फटाक्यांच्या किंमती 20 टक्क्यांनी वाधारलेल्या आहेत. दिवाळी अवघ्या दिवसांवर येवून ठेपली असून लक्ष्मी पुजनाच्या दोन ते तीन दिवसआधी फटका मार्केटमध्ये मोठी उलाढाल होण्याचा विश्वास विक्रेत्यांना आहे.
दिवाळी सणाचे आकर्षण सर्वांनाच असते. हिंदू धर्मियामध्ये सर्वात मोठा सण म्हणून दिवाळीकडे पाहिले जाते. घराची, दुकानाची रंगरंगोटी, नवे नवे कपडे, घरात गोडधोड, पंचपक्वान्न, फराळ यांची जोरदार तयारी सर्वत्र सुरू असते. पूर्वी महिनोमहिने आधी दिवाळीची तयारी सुरू होत असे. मात्र, काळाच्या ओघात सर्व काही बदलले आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणासाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे.
प्रकाशाचा सण म्हणून साजरा करणार्‍या या सणात बच्चे कंपनीचे मुख्य आकर्षण म्हणजे फटाके. परंतु यंदा या फटाक्यांवर भाव वाढीचे सावट आहे. नगरचे फटाक्यांचे मार्केटमध्ये जवळपास 90 ते 95 टक्के फटाक्यांचा माल हा शिवकाशी येथून येतो. उर्वरीत माल मध्यप्रदेश, राजस्थानसह महाराष्ट्राच्या विविध भागातून आणला जातो. नगरच्या मार्केटमध्ये फटाक्यांची होलसेल खरेदी करण्यासाठी नगर जिल्ह्यासह औरंगाबाद, बीड, जालना, पुणे, नाशिक जिल्ह्यातून व्यापारी येत असतात. यंदा मात्र, फटका किंमतीत 20 टक्क्यांनी वाढ झाल्याने त्याचा परिणाम फटाक्यांच्या बाजारावर झाला आहे. जीएसटीमुळे फटाक्यांवर आकारण्यात येणारा कर (टॅक्स) हा 14 टक्क्यांनी वाढला आहे. याशिवाय पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्यामुळे वाहतूक खर्च वाढला आहे. त्याचाही परिणाम किंमतीवर झाला आहे. त्यामुळे नगरचे फटाक्याचे मार्केट सज्ज झाले आहे. दरवर्षीपेक्षा यंदाची दिवाळी थंडी थंडी आहे.
स्टॉल उभारण्यासाठी कोणालाही कापड वापरण्यास परवानगी देण्यात आली नाही. प्रत्येक स्टॉलच्या बाहेर छोटे अग्निशमन सिलेंडर लावण्यात आले आहे. सीसीटीव्हीसुद्धा बसवण्यात आले आहेत. याशिवाय 24 तास अग्निशमन विभागाची गाडी याठिकाणी तैनात करण्यात आली आहे. हे मैदान पत्र्याचे पार्टशियन लावून बंद करण्यात आले आहे. मार्केटमध्ये प्रवेश करण्यासाठी तीन प्रवेशद्वार ठेवण्यात आले आहेत.

फटाके स्टॉल गावाबाहेर
नगर शहरात पूर्वी अनेक ठिकाणी फटका विक्री व्हायची. यंदा मात्र, सुरक्षेच्या कारणामुळे कल्याण रोड, सावेडी आणि केडगाव या ठिकाणी फटाका विक्री करण्यात येत आहे. या ठिकाणी विक्रेत्यांनी विशेष काळजी घेतलेली दिसून येते. फटाका व्यापारी असोसिएशन यांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. फटाका व्यापारी असोसिएशन यांच्या अंतर्गत नगर-कल्याण महामार्गावर असणार्‍या मैदानावर होलसेल फटाक्याच्या मार्केटमध्ये 50 स्टॉल लागले आहेत. प्रत्येक दोन स्टॉलमध्ये दहा फुटांचे अंतर आहे.

प्रदूषणविरहित फटाके
या वर्षी प्रदूषणमुक्त फटाके बाजारत विक्रीसाठी दाखल झाले आहेत. यात प्रमुख्याने बुलेट ट्रेन, कलर कोटी, अ‍ॅग्री बर्ड, फॅन्सी बर्ड, पेपर शॉट, आदींसह विविध भारतीय बनावटीचे प्रदूषण विरहित फटाके यावर्षीचे आकर्षण ठरत आहेत. चायना आपटबारला मोठी मागणी होती. मात्र, त्याला तोडीस तोड भारतीय आपट बार बाजारात आले आहेत.

सध्या फटका मार्केटमध्ये शांतता आहे. साधारण 25 ते 30 टक्के विक्री झाली आहे. दिवाळीपूर्वी फटके खरेदीसाठी गर्दी होईल. यंदाही मोठ्या प्रमाणात फॅन्सी फटाके मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.
-रोहित साठे, फटाके विक्रेता, नगर.

LEAVE A REPLY

*