रोहकले तुमचा सभासदांवर भरोसा नाय काय? ; शिक्षक बँकेतील सभासंदाची लूट थांबवा : अडसूळ

0
कर्जत (वार्ताहर) – अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेमध्ये सध्या सभासदांची प्रचंड लुट सुरू असुन सॉफ्टवेअरच्या नावाखाली सुरू असलेली सभासदांची लुट तातडीने थांबवा, बँकेची चाललेली ही मनमानी कारभाराविरोधात बँकेचे अध्यक्ष रावसाहेब रोहकले ‘तुमचा सभासदांवर भरोसा नाय काय’? असे टोला इब्टाचे जिल्हा अध्यक्ष नवनाथ अडसूळ यांनी प्रसिध्द केलेल्या निवेदनात लगावला आहे.

अडसूळ यांनी निवेदनात म्हटले आहे की, कि कर्ज घेणार्‍या सभासदाला लावला जाणारा व्याजदरांने शिक्षकांमध्ये नाराजी आहे. अनेकांच्या तक्रारी आल्याने 20 एप्रिल रोजी 1 लाख 20 हजार कर्ज घेतले होते. त्या बध्दल 4600 रूपये भरले तरीही आज रोजी पुन्हा 1 लाख 19 हजार 775 रूपये कर्ज राहीले आहे, असा सुरू असलेला अन्याय आम्ही सहन करणार नाही. मागील दिड वषार्ंपासून मनमानी कारभार सुरू असून सभासदांची उघडपणे लुट सुरू आहे. यामुळे आता यांच्या विरोधात सर्व जण रस्त्यावर उतरणार आहोत.

आज रविवारी (दि.6) रोजी सकाळी 11 वाजता कर्जत येथील प्राथमिक शिक्षक बँकेच्या शाखेसमोर सर्व शिक्षक संघटना यामध्ये म.रा.प्रा.शि. समिती कर्जत तालुका, शिक्षक संघ कर्जत तालुका व इब्टा शिक्षक संघ कर्जत तालुका यांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, असे श्री.अडसुळ यांनी सांगितले.

शिक्षक बँक कारभारावर साधला कटाक्ष –

निवदेनात म्हटले आहे की, शिक्षक बँकेच्या कारभारात सध्या सुरू आहे मोठा झोल झोल…सॉफ्टवेअरच्या नावाखाली सभासद शिक्षक फिरतायत नुसतेच गोल.. गोल…, सांगा रोहकले अध्यक्ष तुमचा सभासदांवर भरोसा नाय काय..नाय काय.., निवडणुकीत सभासदांना दाखवले नुसते गाजर… गाजर… आता बॅकेंच्या सभासदांना घेतलेल्या कर्जाचा सध्या लागत नाही मेळ मेळ… व्याजदर 10 टक्यांवरून कसा केला 13 टक्के …सांगा… तुमचा सभासदांवर भरोसा नाय…काय…नाय काय.. याद्वारे बँक कारभारावर कटाक्ष साधला आहे.

LEAVE A REPLY

*