कोपर्डी नराधमांना फाशी; निर्णयाचे बेलपिंपळगावात स्वागत

0
बेलपिंपळगाव (वार्ताहर)-कोपर्डी प्रकरणात तीनही दोषींना फाशीची शिक्षा देण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाचे बेलपिंपळगाव येथे स्वागत करण्यात येवून आनंद व्यक्त करण्यात आला. याच शिक्षेची आम्ही वाट पाहत होतो असे मत जो-तो व्यक्त करत होता.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या कोपर्डी खून व अत्याचार प्रकरणाचा आज निकाल लागला.
_कोपर्डीतलं अमानुष क्रोर्य करणार्‍या नराधमांच्या कृत्याचा हिशोब फाशी देऊनही पूर्ण होणार नाहीच पण न्यायालयाने दिलेला निर्णय हा नक्कीच समाधान पोहचवणारा आहे असे अनेक नागरिकांनी सांगितले.
गावातील शिवप्रेमी प्रतिष्ठाण, संभाजी ब्रिगेड, स्वराज्य मंडळ,डॉ बाबासाहेब आंबेडकर मित्र मंडळ, श्री हनुमान विद्यालय, ग्रामपंचायत, सोसायटी, पतसंस्था, नागरिक, महिला, मुली आदीनी या नराधमांना त्यांच्या कृत्याबद्दल फाशी शिक्षा मिळाली म्हणून आनंदोत्सव साजरा केला. या वेळी गावातील सामजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गटकळ, संभाजी ब्रिगेडचे गणेश चौगुले,
माजी सभापती वसंतराव रोटे, माजी सभापती दिगंबर शिंदे, राजू शिंदे, हनुमान पतसंस्था अध्यक्ष कल्याण शिंदे, रिपाइं तालुकाध्यक्ष राजेंद्र साठे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, किशोर बोखारे, उपसरपंच दीपक चौगुले, संभाजी शिंदे, लहुजी सेना अध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, अण्णासाहेब वैद्य, प्रसाद गटकळ, श्रीकांत भांगे, राहुल शिंदे, किरण साठे, गौरव गटकळ,
किशोर कांगुणे, दिलीप लंघे, ,योगेश शिंदे, अमोल धनवटे,आबासाहेब शेळके, रवींद्र गटकळ, गणेश कांगुणे, सचिन जाधव, अमोल वरघुडे, सतीश तर्‍हाळ, सचिन तर्‍हाळ, डॉ. विलास गोर्डे,, बंडुपंत चौगुले, बापूसाहेब औटी, दीपक बारहाते, निलेश कांगुणे, हेमंत शिंदे, हर्षवर्धन शिंदे यांचेसह अनेक ग्रामस्थ हजर होते व त्यांनी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचे व न्यायव्यवस्थेेचे आभार मानले.

फाशीची शिक्षा होऊनही आमची बहिण परत येणार नाही परंतु न्याय मिळाला त्याबद्दल आम्ही न्याय व्यवस्थेचे आभारी आहोत. शिक्षेची तातडीने अंमलबजावणी करणे तागरजेचे आहे व पुन्हा कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी आपण घेऊया.
– गणेश चौगुले (संभाजी ब्रिगेड)

LEAVE A REPLY

*