दीपाली बिहाणी यांना उत्कृष्ट केटरिंग व कुकिंग पुरस्कार

0

सुप्रसिध्द शेफ संजीव कपूर यांच्या हस्ते गौरव

अहमदनगर :  भारतातील सुप्रसिध्द शेफ संजीव कपूर यांच्या हस्ते आर्टिज गॅलरीच्या दिपाली बिहाणी यांना उत्कृष्ट केटरींग व कुकिंग पुरस्काराने सन्माणित करण्यात आले.

कुकिंगच्या माध्यमातून घरा-घरात पोहचलेल्या सजीव कपूर यांचे नाशिक येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. यावेळी बिहाणी यांना पुरस्काराने सन्माणित करण्यात आले.

या कार्यक्रमात देशभरातून उत्कृष्ट शेफ सहभागी झाले होते. कुकिंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच संजीव कपूर यांनी रेसीपी शो घेवून उपस्थितांना पंचवीस प्रकारचे स्वादिष्ट रेसीपी प्रात्यक्षिकासह बनवून दाखविले.

बिहाणी या गुलमोहर रोड येथे महिला व युवतींना कुकिंगसह विविध कला कौशल्याचे प्रशिक्षण देत असतात.

LEAVE A REPLY

*