देशपांडे हॉस्पिटलची इमारत धोकादायक

0

सचिन जाधव यांचे आयुक्तांना पत्र

अहमदनगर : नांगरे गल्ली येथील अहमदनगर महानगरपालिकेच्या कै.बा.देशपांडे दवाखान्याची इमारातीची मागील बाजूची इमारात धोकदायक बनली आहे. ज्या प्रमाणे निंबोडी येेथे जि.प. शाळेचे छत कोसळून जिवीत हानी झालेली आहे. त्यासारखी घटना बाळासाहेब देशपांडे रूग्णालयात होऊ नये म्हणून तातडीने या इमारतीच्या बांधकामाकरिता मनपाने त्वरीत निधी उपलब्ध करून दुरूस्ती करावी अशी मागणी माजी सभापती सचिन जाधव यांनी मनपा आयुक्त यांना पत्राव्दारे केली आहे.
जाधव यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, बाळासाहेब देशपांडे रूग्णालयात शहरातून व जिल्ह्यातून सर्व सामान्य महिला प्रसुतीसाठी मोठ्या प्रमाणात येतात. सदरची इमरात सध्यास्थितीत कमी पडत आहे. सदरची इमारतीच्या मागील बाजूची जागा पडीक झालेली आहे. नुकतीच निबोडी येथे छत कोसळून मोठी जिवित हानी झालेली आहे. त्याच प्रमाणे या पडीक इमारतीमुळे त्या रूग्णाच्या जिवीतास मोठा धोका भाविष्यात होऊ शकतो, त्यामुळे मागील बाजूची इमारत तातडीने उतरवून नव्याने बांधकाम करणे किंवा दुरूस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून सदरील इमारत बांधकाम करण्यासाठी योग्य तो आदेश द्यावा असे पत्रात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*