दहिहंडीच्या रात्री तरूणाला रंगार गल्लीत रटवले

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – दहीहंडीच्या रात्री जुन्या वादातून तरूणास चाकूचा धाक दाखवत सहा जणांच्या टोळक्याने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. चौपाटी कारंजा परिसरातील रंगारगल्ली येथे सोमवारी (दि. 3) रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. योगेश दत्तात्रय ज्ञानपिल्ले (रा. देशमुखगल्ली) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

ज्ञानपिल्ले यानेच पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ओंकार घोलप, शुभम कमाकूल, सनी फाटक, रोहित सोनेकर, शुभम घोलप, योगेश आंधे (सर्व रा. माळीवाडा) असे मारहाण करणार्‍या आरोपींची नावे आहेत. ज्ञानपेल्ली हा मंडप बांधण्याचे काम करतो. सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास रंगारगल्ली परिसरातून तो घरी जात होता. रस्त्यावर थांबलेले ओंकार घोलप, शुभम कमाकुल, सनी फाटक, रोहित सोनेकर व इतर 15 ते 20 जणांनी ज्ञानपेल्ली याला अडवून बेदम मारहाण केली.

या मारहाणीत ज्ञानपेल्ली हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी ज्ञानपेल्ली याने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मपोसई शिरदावडे करत आहे.

LEAVE A REPLY

*