अहमदनगर : क्रॉम्प्टन क्रिकेट करंडक : ‘सारडा’चा साई अ‍ॅकॅडमीवर 83 धावांनी विजय

0

अहमदनगर : येथील सारडा कॉलेजच्या संघाने जालना मधील साई काणे अ‍ॅकॅडमी संघाचा 83 धावांनी धुव्वा उडवला. सारडा कॉलेजने दिलेले 274 धावांचे पाठलाग करतांना साईचा संघ 191 धावांवर गारद झाला. या सामन्याचा मॅनऑफदि मॅच म्हणून 76 धावा करणार्‍या मानव काटे यांला गौरविण्यात आले.
जिल्हा किक्रेट असोसिएशन व क्रॉप्टन ग्रीव्हज लि. यांच्या संयुक्त विद्यामाने वाडिया पार्क मैदानवर सुरू असलेल्या स्पर्धेतील कालचा सामना सारडा कॉलेज विरूध्द जालना येथील साई काणे अ‍ॅकॅडमी यांच्याविरूध्द खेळविला गेला. नाणेफेक जिंकत सारडा कॉलेजच्या कर्णधाराने प्रथम फलदांजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या मानव काटे व सौरभ लोंढे यांने संघाला चांगली सुरूवात करून दिली.मानव यांने चौफेर फटकेबाजी करत 76 धावावर तो बाद झाला. सौरभ व सचिन लाल यांने संघाचा डाव सावरत धावफलक हलता ठेवला. सौरभ यांने 34 व सचिनने 31 धावा केल्या. तर वरद माळी यांनी 30 धावा तर संघास निर्धरित 40 षटकांत 7 गड्यांच्या बदल्यात 274 धावाचा डोंगर साई संघासमोर उभारला. साईचा एकही गोलदांज सारडाच्या फलदांजाना रोखण्यात अपयशी ठरला. रमेश्वर दौड यांने 8 षटकांत 2 गडी बाद केले.
सारडाने दिलेल्या 274 धावांच्या लक्षाचा पाठलाग करतांना साईची मोठी दमछाक झाली. ऋषिकेश पांगरकर व स्वप्निल पठाडे यांनी संघाचा डाव कसाबसा सावरला. ऋषिकेश यांने 41 धावा केल्या तर स्वप्निलने 40 धावा केले. दोघेही बाद झाल्यावर संघाचा डाव पूर्णपणे कोलमडला. एकही फलदांज जास्त काळ मैदानवर तग धरू शकला नाही. अजिंक्य मोरे व यशराज खोलकर डाव सावरण्यात अपयशी ठरले. अंजिक्यनी 19 तर यशराजने 19 धावां केल्या. सारडाच्या गोलंदाजानी अचूक टप्प्यावर गोलदांजी करत साईच्या फलदांजाना रोखले. या सामन्यात ऋषि मराठे यांने सर्वाधिक 4 गडी बाद केले. तर सौहेल पठाण यांने 2 गडी बाद केले. साईचा संपूर्ण संघ 32 षटकांत 191 धावांवर गराद झाला. हा सामना सारडा महाविद्यालयाने 83 धावांनी जालन्याच्या साईसंघावर विजय मिळविला.

LEAVE A REPLY

*