Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

दरोडेखोर बनला साधू

Share
ओळख लपविण्यासाठी केले वेशांतर; नगर पोलिसांकडून पपड्या जेरबंद
अहमदनगर (प्रतिनिधी) – कुख्यात दरोडेखोर पपड्या ऊर्फ व्यंकटी काळेची पोलिसांपासून बचावाकरीता साधूचा वेष पांघरून गावोगावी करून भटकंती सुरू होती. रुद्राक्ष माळा सोबत बाळगून तो पोलिसांना वेड्यात काढत असला तरी नगर पोलिसांच्या नजरेतून तो सुटला नाही. बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर येथे नगर पोलिसांनी आज (सोमवारी) त्याच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले. त्याच्यासोबत त्याची बायको रेखा हीदेखील पोलिसांच्या जाळ्यात सापडली.
महाराष्ट्रातील चंद्रपूर (2003), तेलांगणातील सोमपेठा (2002) आणि मध्यप्रदेशातील कोतवाली (2006) पोलीस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यात पपड्याला जन्मठेपेची शिक्षा लागलेली आहे. नागपूर सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत असताना तो मुलाच्या लग्नासाठी पॅरोल रजेवर बाहेर पडला. तो परत जेलमध्ये गेलाच नाही. बाहेर असलेल्या पपड्याने टोळी तयार करत राज्यातील सराफी दुकानांना टार्गेट केले. राज्यातील सांगली, नागपूर, परभणी,गोंदिया, यवतमाळ तसेच भोपाळ, उत्तर प्रदेशातील सराफी दुकानांवर दरोडे टाकून त्याने लूटमार केली. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील लक्ष्मी ज्वेलर्स या सराफी दुकानावर19 ऑगस्टला डाका टाकला होता. त्यात शाम धाडगे या सराफाचा मृत्यू झाला होता. नगर एलसीबीचे पीआय दिलीप पवार हे त्या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. पपड्याच्या टोळीतील 13 आरोपी व चोरीचे सोने विकत घेणारे 3 सराफ असे एकुण 16 आरोपी एलसीबीने यापूर्वीच अटक केले. मात्र गुन्ह्याचा मास्टरमाईंड पपड्या मात्र पसार झाला होता.

पपड्या हा सेंदला (ता- मेहेकरजि- बुलढाणा) येथे पारधी वस्तीवर त्याची पत्नी रेखा हिला भेटण्यासाठी साधूचे वेषामध्ये येणार असल्याची गोपनीय माहीती एलसीबीचे पीआय दिलीप पवार यांना मिळाली. पोसई रोहन खंडागळे, पोहेको सुनिल चव्हाण, योगेश गोसावी, नानेकर, पोना मल्लिकान बनकर, दिगंबर कारखेले,अण्णा पवार, विनोद मासाळकर, रवि कर्डिले, दत्तात्रय गव्हाणे, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, मनोज गोसावी, मन्सूर सय्यद, सचिन अडबल, संतोष ओढे, राहूल सोनटक्के, भागनाथ पंचमूख, योगेश सातपुते, चापोहेको देविदास काळे, विजय ठोंबरे, बाबासाहेब भोपळे यांचे पथक तयार करून त्यांना सेंदला येथे रवाना केले. या पथकाने आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास सेंधला येथील पारधी वस्तीवर छापा टाकला. पोलीस छापा टाकण्यापूर्वीच पपड्या तेथून पसार झाला होता. बायको रेखा हिला घेऊन तो मेहेकर बस स्टॅण्डवर गेला असून तो पळून जात असल्याचे पोलिसांना समजले. त्यांनी सापळा रचून पपड्याला पत्नी रेखासह (वय- 40 वर्षे, रा. सुदर्शननगर, वर्धा) ताब्यात घेतले.

वर्धा जिल्ह्यातील सुदर्शननगर येथील पपड्या उर्फ संजय उर्फ राहूल व्यंकटी उर्फ महादू उर्फ महादेव उर्फ गणपती काळे उर्फ तुकाराम चव्हाण याचे वय 55 वर्षे इतके आहे. तारुण्यातच तो गुन्हेगारीकडे वळाला. सराफी दुकानांची लूट करून मालामाल होण्याचा मोह त्याला जडला. याही वयात त्याने सराईत दरोडेखोरांची मोट बांधत टोळी तयार केली. केवळ राज्यातच नव्हे तर आंध्र प्रदेश, उत्तर प्रदश, मध्यप्रदेशातील सराफी पेढ्या त्याने लुटल्या आहेत.
………….
‘छबी’ने पटविली ओळख..
पपड्या अनेक नावांची राज्यात वावरतो. प्रत्येक ठिकाणी तो नवं नाव धारण करून फिरतो. नगर पोलिसांनी त्याला साधूच्या वेशात पकडलं अन् त्याची ओळख पटविण्याचा अवघड कामही सोप्पं केलं. त्याच्या नावाच्या गुन्ह्यांनी पोलिस डायर्‍यांची अनेक पानं भरली आहेत. त्यात त्याच्या छातीवर ‘लव्हरचे नाव ‘छबी’ असे गोंदलेले असल्याचा उल्लेख पोलीस दप्तरी आहे. त्याने नगर पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्या छातीची तपासणी केली. त्यावेळी ‘छबी’ दिसली. त्यामुळं तोच पपड्या असल्यावर शिक्कामोर्तब झालं.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!