Type to search

आता एआर कुलकर्णींच्या इन्क्वॉयरीची बारी

आवर्जून वाचाच सार्वमत

आता एआर कुलकर्णींच्या इन्क्वॉयरीची बारी

Share
प्रांजल सोनवणे घोटाळ्याची व्याप्ती, स्वरूपाची घेतली माहिती
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर सहकारी बँकेतील घोटाळा नेमका कसा घडला याची माहिती घेण्याकरीता पोलिसांनी आज (सोमवारी) नगरचे एआर राम कुलकर्णी यांची इन्क्वॉयरी सुरू केली. त्यासाठी बँकेच्या चौकशीचा अहवाल घेऊन कुलकर्णी पोलिसांत हजर झाले आहेत.

एम्स या कार्पोरेट हॉस्पिटलचे बांधकाम व मशिनरी खरेदीसाठी प्रवर्तक, संचालक डॉक्टरांनी शहर सहकारी बँकेतून कर्ज घेतले. हे कर्ज घेताना फसवणूक झाल्याची तक्रार डॉ. सिनारे, डॉ. कवडे, डॉ. श्रीखंडे यांनी पोलिसांत दिली. त्या तक्रारीत बँकेचे संचालक मंडळही आरोपीच्या पिंजर्‍यात उभे राहिले आहे. शनिवारी पोलिसांनी बँक संचालकांची चौकशी केली. डॉक्टरांनी सहकार विभागाकडेही तक्रार केली होती. त्यानुसार सहकार आयुक्तांच्या आदेशाने नगरचे एआर राम कुलकर्णी यांनी बँकेची चौकशी करून अहवाल दिला होता. त्यामुळं या घोटाळ्याची त्यांना चांगली माहिती आहे. पोलिसांनी आज त्यांनाच चौकशीसाठी बोलविले. घोटाळा नेमका कसा घडला, त्याची व्याप्ती किती? या अनुषंगाने पोलीस कुलकर्णी यांच्याकडून माहिती घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!