बुर्‍हाणनगर रस्त्यावर डेडबॉडी शेतात रक्त अन् बांगड्या

0
घातपाताचा नातेवाईकांचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी) – बुर्‍हाणनगर रस्त्याकडेला आज सकाळी एका महिलेची डेडबॉडी मिळाली. त्यापासून काही अंतरावर शेतात रक्त अन् बांगड्याही आढळल्या. या महिलेचा अपघात झाला की घातपात अशी चर्चा सुरू असतानाच नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. नेमकं काय घडलं? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

बुर्‍हाणनगर रस्त्याने पायी जाणार्‍या महिलेला गुरूवारी मध्ये रात्री अज्ञात धडक दिली. त्यात महिलेचा जागीच मृत्य झाला असं सांगितलं जात आहे. दरम्यान हा अपघात नूसन घातपात असल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. वर्षा साठे असे मृत महिलेचा नाव आहे.

गुरूवारी (दि.30) मध्यरात्रीच्या सुमारास साठे या बुर्‍हानगरच्या रस्त्याने जात होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यांना धडख दिल्याची चर्चा घटनास्थळी होती. मात्र महिलेचा खून झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान अपघाताच्या ठिकाणापासून काही अंतरावर शेतात मोठ्या प्रमाणात रक्त सांडल्याचे दिसून आले. त्या जागेवरच महिलेच्या हातातील बांगड्या, केसामधील किल्प तसेच अन्य काही संशयीत वस्तू आढळल्या आहेत.

एक संशयित पोलिसांच्या ताब्यात
याप्रकरणी शहरातील एका हॉस्पिटल मधील कर्मचार्‍यास पोलिसांनी संशीयत म्हणून ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. घटनेची माहिती मिळताच भिंगारचे पोलिस तत्काळी घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी असलेले रक्त, संशयीत वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून डेडबॉडी पीएमसाठी सिव्हील हॉस्पिल येथेे पाठविण्यात आली आहे. नेमका काय प्रकार घडला, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

*