नेप्तीचौकात कार पेटविली

0

नालेगावचे दोघे आरोपी

अहमदनगर (प्रतिनिधी) – वैयक्तिक करणावरून रस्तावर चारचाकी पेटविल्या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात दोघाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी (दि. 9) 4 वाजण्याच्या सुमारास नेप्ती नाका परिसरात घडली. याप्रकरणी पोना.रामदास जयराम सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे.प्रकाश किशोर वाकळे, किशोर देवकर (रा.नालेगाव) अशी आरोपींची नावे आहे.

गुरूवारी सकल मराठा मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. नेप्ती नाका परिसरात असणार्‍या चिंतबर मोटर्स पेंटींग नावाने दुकान आहे. शहरात बंदच्या पार्श्वभूमीवर नेप्ती चौकात बंदोबस्त तैनात होता. त्यावेळी चौकात असणार्‍या प्रकाश वाकळे व किशोर देवकर यांनी दुकानासमोर लावलेल्या चारचाकीवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिली. या घटनेची माहिती समजताच डिवायएसपी संदीप मिटके, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे, सपोनि पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोना.रामदास जयराम सोनवणे यांनी फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मोरे करत आहे.

LEAVE A REPLY

*