व्यावसायिकाला बदडले

0

5 जणांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी)- घर सोडून दे, असे म्हणाल्याच्या कारणावरून एका व्यवसायिकास बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेलदार गल्ली येथे सोमवारी दि.7 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी मजिद मुनीर खान यांनी फिर्याद दिली आहे.
एजाज इसाक शेख, नवेद इसाक शेख, सक्लेन शेख, सालेकीन जबीर शेख, इरफान शेख उर्फे (रा.बेलदार गल्ली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

सोमवारी रात्री बेलदार गल्ली परिसरात मजिद खान हे आपल्या पत्नीसह थांबले होते. त्यावेळी एजाज शेख, नवेद शेख व इतरांचे मजिद यांच्या सोबत किरकोळ कारणावरून वाद घालण्यास सुरूवात केली. त्यावेळी ‘तू बेलदार गल्ली येथे का आला. असे म्हणत शिवीगाळ करत अन्य साथीदारांनी लोखंडी पाईप, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली तर एजाज शेख यांच्याकडे असलेल्या तलवारीने मजिद यांच्यावर जीव घेणा हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई सणस करत आहे.

LEAVE A REPLY

*