Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

पुण्यात राहून नगरात घरफोड्या

Share

एलसीबीकडून तिघांना अटक

अहमदनगर (प्रतिनिधी) – बीड जिल्ह्यातून तडीपार झालेल्या गुन्हेगाराने पुण्यात ठाण मांडून नगरात घरफोड्या सुरू केल्या. भरदिवसा एकामागोमाग एक घरफोड्या करत पोलिसांना आवाहन देणार्‍या टोळीला थेट पुण्यात जाऊन पकडण्यात नगर पोलिसांना यश मिळालं आहे. एलसीबीने पुण्यातून अक्षय ऊर्फ चिंटू मिठू गायकवाड याला पकडून 55 हजार रुपयांचा मुद्देमाल रिकव्हर केला.

अक्षय उर्फ चिंटू मिठू गायकवाड (रा.पुणे), सचिन राजेंद्र कापूरे (रा.औरंगाबाद), विजय राजाराम गायकवाड (रा.पुणे) अशी जेरबंद करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील अक्षय हा या टोळीचा म्होरक्या असून बीड जिल्ह्यात त्यांच्यावर 39 चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळं त्याला बीड जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं. त्यानंतर त्याने पुण्यातील रामवाडीत बिर्‍हाड मांडलं. तेथे गुन्हेगारी टोळीची मोट बांधली. या टोळीने गुन्हेगारीसाठी अहमदनगर शहराची निवड केली. भरदिवसा घरफोड्या करण्यात गायकवाड तरबेज आहे. या टोळीने सावेडी परिसरातील हिरालाल अदिचंद संकलेचा व राजन भगीराथ तिवारी यांचे घर फोडून 1 लाख 16 हजारां रूपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी तोफखाना पोलिसा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घरफोड्या करणारी टोळी पुण्यातील असून गायकवाड त्याचा म्होरक्या असल्याची माहिती एलसीबीचे पीआय दिलीप पवार यांना मिळाली. एलसीबीचे हवालदार गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, सोन्याबापू नानेकर, रविंद्र कर्डिले, रवि सोनटक्क्े, दीपक शिंदे, अण्णा पवार, विशाल दळवी, संतोष लोंढे, राहूल सोळूंके, सचिन कोळकर, मेघराज कोल्हे सचिन अडबल यांचे पथक पीआय पवार यांनी पुणे येथे पाठविले. या पथकाने रामवाडी परिसरात सापळा लावत अक्षय उर्फ चिंटू मिठू गायकवाड याला ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवित त्याने अन्य साथीदारांची नावे सांगितली. रामवाडी परिसरातून नगर पोलीस पथकाने सचिन राजेंद्र कापूरे, विजय गायकवाड यांना ताब्यात घेतले. तिघांच्या या टोळीकडून दीड किलो चांदी, शिक्के, कॅमेरे असा 55 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!