Type to search

आवर्जून वाचाच सार्वमत

एमएसईबीच्या इंजिनिअरला दाखवले प्राध्यापक!

Share
अडसूळ कॉलेजची करामत; अध्यक्षांविरोधात गुन्हा
अहमदनगर (प्रतिनिधी) – नोकरीसाठी ना अर्ज केला ना कागदपत्रे दिली, तरीही एमएसईबीत अभियंता असलेल्या तरुणीला अडसूळ कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्ती दाखविण्यात आल्याची अजब प्रकार समोर आलाय. ही करामत करणार्‍या कॉलेजचे अध्यक्ष व इतरांविरोधात पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

अनिरुध्द माणिक अडसुळ असे गुन्हा दाखल झालेल्या अध्यक्षाचे नाव आहे. सुरेखा शिवाजी भालशंकर असे फिर्याद देणार्‍या तरुणीचे नाव आहे. सुरेखा ही जालना येथे एमएसईबीत सहाय्यक अभियंता म्हणून नोकरीस आहे. 2012 ते 2018 या काळात ती अडसुळ कॉलेजमध्ये प्राध्यापक असल्याचे दाखविण्यात आले आहे. संस्थेच्या वेबसाईटवरून सुरेखा भालशंकर यांना ही बाब दिसून आली. अनुसुचित जातीचे प्रमाणपत्र सादर करून तिची बदनामीही करण्यात आली आहे.

लाभासाठी खटाटोप
कोणतेही शैक्षणिक कागदपत्रे दिली नाही अन् नियुक्तीपत्रही स्वीकारलेले नाही असे असतानाही प्राध्यापक म्हणून नावाचा गैरवापर करून आर्थिक लाभाकरीता फसवणूक केल्याचे भालशंकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!