Type to search

आवर्जून वाचाच सार्वमत

‘प्यासा’त आणखी एकाला बेड्या

Share
खंडणी प्रकरणात पोलीस करणार कारवाई
अहमदनगर (प्रतिनिधी)- बेकायदा बांधकामाचे हत्यार काढत हॉटेल मालकास खंडणी मागितल्या प्रकरणात आणखी एकाचे नाव लोकेट झाले आहे. पोलिस त्याच्या हातात लवकरच बेड्या ठोकणार आहे. तोही एक ठेकेदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चितळे रस्त्यावरील प्यासा हॉटेलचे मालक कल्पेश परदेशी याच्याकडे 25 लाख रुपयांची खंडणी ठेकदार कैलास शिंदे याने मागितली. खंडणीचे 1 लाख रुपये स्वीकारताना शिंदे यास पोलिसांनी पकडले. अटकेतील शिंदे हा पोलीस कोठडीत आहे. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने आणखी एकाचा सहभाग असल्याची कबुली दिली आहे. तोही एक ठेकेदार असून शिंदेचाच मित्र असल्याचे समजते.

नावाची गोपनियता
निखील ढोणे, सुनील वसंत दळवी यांना शिंदे याने परदेशीकडे मध्यस्थीसाठी पाठविले होते. दळवी याने बाबासाहेब भगत यास तडजोडीसाठी पाठविले होते. दळवी यांच्या बुर्‍हाणनगर येथील घरी तडजोडीची बैठक झाली. तेथे शिंदे हा त्याचा मित्र पोपट पाराजी राऊत यांच्यासह पोहचला होता. हीच चेन पकडून पोलिसांनी तपास केला. गोपनीयतेचा भाग म्हणून पोलिसांनी आरोपीचे नाव सांगण्यास नकार दिला, मात्र चेनमधीलच तो एक असावा अशी चर्चा सुरू आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!