प्रेमासाठी त्याने दिली धमकी, तरूणीची पोलिसांकडे तक्रार

0

अहमदनगर : माझ्याशी प्रेमसंबंध ठेव यासाठी तरुणाने तिच्या घरात जाऊन तिला धमकी दिली. कुर्‍हाड उगारून तिच्याशी बेशिस्त वर्तनही केले. संतापलेल्या तरुणीने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. सावेडीतील सहकारनगर परिसरात ही घटना घडली.

फैजाज कलीम बागवान (रा. पारशाखुंट) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. सहकारनगर परिसरातील ही मुलगी शिक्षण घेत आहे. पारशा खुंट भागातील फैजाज कलीम बागवान हा तिच्या घरी आला. माझ्याशी प्रेमसंबंध ठेव असे म्हणत त्याने धमकावले.

तरुणीने त्यास नकार दिला असता त्याने कुर्‍हाड उगारून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्नही केला.

बेशिस्त वर्तन करून तिची छेडही काढली. या प्रकाराने संतप्त झालेल्या तरुणीने तोफखाना पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

LEAVE A REPLY

*