अहमदनगर : क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोत मांदियाळी

0

अहमदनगर:  घराचे स्वप्न साक्षात उतरविण्यासाठी क्रेडाई आयोजित प्रॉपर्टी एक्स्पोत ग्राहकांची गर्दी झाली आहे. शहराच्या विविध भागातील प्रॉपर्टी एकाच छताखाली बघण्यासाठी उपल्बध असल्याने ग्राहकांची सोय झाली आहे.
रेप्युटेड 30 बिल्डरांचे 50 प्रोजेक्ट या एक्स्पोत सादर करण्यात आले आहेत. उत्कृष्ट प्रोजेक्ट सादरीकरणाचा पहिले बक्षीस बंगडीवाला व बजाज असोशिएटला मिळाले आहे.
सावेडीतील झोपडी कॅन्टीनमागील सेंट मोनिका अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात प्रॉपर्टी एक्स्पो 2017 शुक्रवारपासून सुरू झाला आहे. शनिवारी प्रोजेक्ट पाहण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्टमुळे ग्राहकांच्या मनातील शंका दूर झाल्याने ग्राहकांत समाधानाचे वातावरण दिसून आले. रेरा कायद्यामुळे पादर्शकता वाढल्याने ग्राहकांमध्ये विश्‍वास निर्माण झाला आहे. क्रेडाईचे अध्यक्ष संजय गुगळे, प्रकाश मेहता, रवींद्र मुळे, मकरंद कुलकर्णी, अमित वाघमारे, विक्रम जोशी, सचिन कटारिया, दीपक बांगर हे एक्स्पो यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.

LEAVE A REPLY

*