Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

मुख्यमंत्र्यांनी राज्यात दुष्काळ जाहिर करावा-खा. अशोक चव्हाण

Share
संगमनेर (प्रतिनिधी)- राज्यात सर्वच क्षेत्राची अवस्था बिकट झाली आहे. धरणांमध्ये 25 ते 30 टक्के पाणी शिल्लक आहे. जेव्हा कॉंग्रेसने जनसंघर्ष यात्रा सुरु केली तेव्हा मुख्यमंत्र्यांना जाग आली आणि मग त्यांनी 31 ऑक्टोबरला दुष्काळ जाहिर करतो असे सांगितले. कदाचित मुख्यमंत्र्यांनी पंचांग बघितलं असेल. आता इथून पुढे पंचांग बघूनच त्यांची पुढची धोरणं ठरतील असा टोला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी लगावत जनसंघर्ष यात्रेशी मशाल राज्याच्या कान्याकोपर्‍यात पोहचवा, संवेदनाहिन भाजपा सरकारला हद्दपार करा, असे आवाहनही त्यांनी केले.
कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचे संगमनेरात आगमन झाले. माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात व कॉंग्रेस पदाधिकार्‍यांनी यात्रेचे जोरदार स्वागत केले. बीएसटी कॉलेजपासून जनसंघर्ष यात्रा मालपाणी लॉन्स येथे आली. त्यानंतर जाहिर सभेत मार्गदर्शन करतांना खा. चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. बाळासाहेब थोरात, नसीम खान, सचिन सावंत, शरद रणपिसे, शोभाताई बच्छाव, राजाराम पानगव्हाणे, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. हुस्नबानो खलिपे, आ. भाऊसाहेब कांबळे, अशिष गोयल, डॉ. सुजय विखे पाटील, शरद आहेर, घनश्याम शेलार, विनायक देशमुख, दुर्गाताई तांबे, शरयु देशमुख आदि मान्यवर उपस्थित होत.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!