भुजबळ उतावळे

0

शहर जिल्हाध्यक्षपदाचे भिजत घोंगडे

अहमदनगर (प्रतिनिधी) – दीप चव्हाण यांनी काँग्रेस नगर शहरजिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर स्वत:ची नियुक्ती व्हावी यासाठी उतावळे झालेले ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी जोरदार लॉबिंग केले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे मागणी करणारे पत्र देत भुजबळ यांनी दावाही केला आहे. दरम्यान चव्हाण यांनी ‘शहराला लवकरच अध्यक्ष मिळेल’ असे टिपीकल उत्तर देत भुजबळाच्या पत्राकडे दुर्लक्ष केले.

गत विधानसभा निवडणुकीवेळी तत्कालीन अध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांनी राजीमाना दिल्यानंतर पक्षाची धुरा दीप चव्हाण यांच्या खांद्यावर तात्पुरती सोपविण्यात आली होती. गेल्या साडेचार वर्षापासून दीप चव्हाण हेच नगर शहरजिल्हाध्यक्ष पदाचे प्रभारी कामकाज करत होते. महापालिकेच्या निवडणुकीत स्वत: आणि पत्नीला तिकिट मिळवताना त्यांनी पक्षाकडे पदाचा राजीनामा सुर्पुद केला. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनीही दीप चव्हाण यांचा राजीनामा मिळाल्याचे सांगितले. रिक्त असलेल्या अध्यक्ष पदावर नियुक्ती व्हावी यासाठी ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ हे उतावळे झाले आहेत.

पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सह्या असलेले निवेदन त्यांनी प्रदेशाध्यक्षांना दिले. या पत्रात दीप चव्हाण यांच्या कार्यकाळात पक्ष कसा रसातळाला गेला येथपासून ते त्यांच्या वैयक्तिक स्वार्थी निर्णयांच्या आरोपाचा पाढा निवेदनात वाचला आहे. निवेदनावर नगरसेवक, कार्यकर्त्यांची नावे लिहून ते चव्हाण यांना दिले गेले. मात्र त्यावर बहुतांश कार्यकर्त्यांनी सह्या केल्या नाहीत. एका नगरसेविका मिस्टरांनी तर भुजबळ यांचे जागेवरच कान उपटले. पत्रकार परिषदेतच अशोक चव्हाण यांनी नगरला लवकरच नवा शहरजिल्हाध्यक्ष मिळेल असे सांगत त्यावर अधिक भाष्य करणे टाळले.
भुजबळ यांना पक्षाचा शहरजिल्हाध्यक्ष होण्याची घाई झाली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हे पद आपल्यालाच मिळावे यासाठी भुजबळ यांनी लॉबिंग सुरू केले आहे.
…………………..

LEAVE A REPLY

*