Type to search

Breaking News आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Share
सार्वमत ऑनलाईन
अहमदनगर (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसापासून पेट्रोल – डिझेलचे दरामध्ये वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक चांगलेच हैराण झाले आहे. याचा निषेध करण्यासाठी मंगळवार (दि.२५ सप्टेंबर) रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शहरातील इंपिरियल चौकात मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले आहे. दरम्यान काँग्रेसच्या नेते मंडळींनी इंपिरियल चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मानवंदना करत या मोर्चास सुरुवात केली आहे.

हा मोर्चा माळीवाडा परिसरातून मार्केट यार्ड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. यावेळी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले आहे. मार्केट यार्द परिसरातील डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालावर धडकणार आहे. यामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्यासह प्रदेश सदस्य विनायकराव देशमुख, उबेद शेख, निखिल वारे आणि काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झालेले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!