अहमदनगर : नगर कॉलेजचे रक्तदानविषयी पथनाट्य

0
अहमदनगर : अहमदनगर महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना (एसएसएस) आणि जनकल्याण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रक्तदान जीवनदान’ या विषयावर पथनाट्य व जनजागृतीपण फेरी काढण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांच्या प्रोत्साहनाने व मार्गदर्शनाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पथनाट्याचे उद्घाटन उपप्राचार्य डॉ.नदंकुमार सोमवंशी यांच्या हस्ते झाले. यावेळी रजिस्ट्रार श्री.ए.वाय.बळीद, डॉ.अभय शालीग्राम, डॉ.शरद बोरुडे, डॉ.प्रकाश सुर्यवंशी तसेच जनकल्याण रक्तपेढीचे संचालक प्रा. भानुदास जगताप, प्रशासकीय अधिकारी मुकेश साठे, डॉ. विलास मढीकर, प्रकाश स्मार्त, सागर उंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
वाडिया पार्क, लक्ष्मी कारंजा येथे रक्तदान जीवनदान या विषयावर पथनाट्य सादर केले.
या पथनाट्यामध्ये 25 विद्यार्थ्यांंनी अभियन केला तर अनेकांनी सहभाग नोंदविला.
पथनाट्य व फेरीचे संयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रकाश सुर्यवंशी यांनी केले. त्यांना डॉ.शरद बोरुडे, डॉ.भागवत पटकाळे व सागर उंडे यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

*