तालुक्यात दुष्काळ जाहीर करा; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन

0
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या वतीने धरणे आंदोलन
अहमदनगर : नगर तालुक्यात दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहे. तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला असून यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी नगर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे.

दरम्यान सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या वतीने धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. यावेळी गजानन भाडवलकर,दादा दरेकर,माणिकराव विधाते,कुमार वाकळे, पापमिया पटेल,अनिल नरवडे,सागर वाळुंज,वैभव म्हस्के, तुकाराम भापकर, दासी फुलारी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*