Type to search

आवर्जून वाचाच सार्वमत

गाड्यांच्या गाडीला मनपाचा ग्रीन सिग्नल

Share

मनपा-दीपाली ट्रान्सपोर्टमध्ये बससेवेचा करार नगरकरांना बससेवेची दिवाळी भेट

अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.नगर महापालिकेच्या वतीने सुरू असलेली बससेवा काही अडचणींमुळे बंद करण्यात आली होती. या आता ही शहर बससेवा नव्याने दीपाली ट्रान्सपोर्टसमवेत करार करून त्यांना चालविण्यास देण्यात आलेली आहे.
दिवाळीपर्यंत 15 नवीन गाड्याची नगरकरांना बससेवेच्या माध्यमातून भेट मनपाकडून दिली जाणार आहे. नगर शहर उपनगरामध्ये या गाड्या धावणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. टप्प्याटप्प्याने सर्व उपनगरामध्ये महापालिकेची बससेवा सुरू करण्यात येणार आहे, असे महापौर सुरेखा कदम यांनी सांगितले.

अ.नगर महापालिकेच्या वतीने शहर बससेवेचा दीपाली ट्रान्सपोर्टसमवेत करारनामा संपन्न झाला. यावेळी महापौर सुरेखा कदम बोलत होत्या. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, युवराज गाडे आदी उपस्थित होते.

युवराज गाडे म्हणाले की, पहिल्या टप्प्यात नवीन 15 गाड्या नगर शहरामध्ये शहर बससेवा देण्यासाठी सुरू करणार आहोत. नागरिकांना सर्व सुखसुविधांयुक्त अशा गाड्या असणार आहे. टप्प्याटप्प्याने अजून काही गाड्या वाढवून शहराच्या सर्व भागामध्ये बससेवेच्या माध्यमातून शहरवासीयांना एक चांगल्या दर्जाची बससेवा देण्याचा दीपाली ट्रान्सपोर्टचा मानस आहे. महापालिकेच्या कराराला आम्ही बांधील असून, जास्तीत जांस्त चांगली सेवा देण्याचा प्रयत्न दीपाली ट्रान्सपोर्टच्यावतीने करण्यात येणार आहे, तसेच उत्तम सेवा देण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!