Type to search

Breaking News आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

Breaking : साईभक्तांच्या गाडीला जामखेडजवळ अपघात; 8 जखमी

Share
सार्वमत ऑनलाईन 
अहमदनगर : नगर -जामखेड रोडवर जामखेड पासुन १० किलोमीटर आंतरावरील पोखरी फटा येथे साई भक्तांच्या इनोव्हा गाडीला आज मंगळवार (दि ४ सप्टेंबर) रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. गाडी पुलावरून खाली गेल्याने हा अपघात घडला असल्याची प्राथमिक स्तरावर माहिती मिळते आहे.

दरम्यान ; या अपघातात ८ जण जखमी झाले असून यामधील ३ जणांची प्रकृती नाजूक असल्याचे समजते आहे.जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी जामखेडचे माजी सरपंच सुनिल कोठारी यांनी मदत केली. जखमींवर जामखेड च्या खाजगी व ग्रामीण रुग्णालयात डॉ युवराज खराडे, डॉ राव, डॉ ठाकरे यांनी उपचार केले. अपघाताची माहिती समजताच परिसरात मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!