Type to search

Breaking News आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

५०० फुट दरीत कार कोसळली ; एक ठार तर दोघे गंभीर जखमी

Share
घारगाव (वार्ताहर)-पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली गावाजवळ एकल घाटात भरधाव वेगाने जाणारी मारुती इकोव्हॅन घाटातील लोखंडी कठडे तोडून पाचशे फुट खोल दरीत कोसळली आहे. हा अपघात रविवार (दि.९ सप्टेंबर) रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडला असून या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी कि, एकल घाटातील उतारावर ही घटना घडली. शिर्डीहून पुण्याच्या दिशेने जाणारी (एमएच 14 एफसी 1487) मारुती इकोव्हॅन घाटात असलेले लोखंडी कठडे तोडून 500 फुट खोल दरीत कोसळली. या अपघातात संजय मधुकर साळवे (वय 43, रा. रमाबाई नगर, पिंपरी चिंचवड, पुणे) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. तर या इकोव्हॅन मधील सयाजी बापू वाळूंज (भोसरी, पुणे), सचिन बाळू मोटे (नेहरूनगर, पिंपरीचिंचवड, पुणे) हे दोन जखमी झाले. जखमींवर आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
घारगाव पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे, नामदेव बिरे, आदिनाथ गांधले आदींनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना दरीतून बाहेर काढण्यासाठी तातडीचे प्रयत्न सुरू केले. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!