Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयआत्मनिर्भरसाठी भाजपने दिली जबाबदारी

आत्मनिर्भरसाठी भाजपने दिली जबाबदारी

अहमदनगर (प्रतिनिधी)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्याकरीता नगर शहर भाजपने कंबर कसली आहे. जनसामान्यापर्यंत ही महत्त्वकांक्षी योजना पोहचावी यासाठी शहर भाजपने पदाधिकारी नियुक्त केले आहेत. हे पदाधिकारी सामान्य लोकांना योजनेचा लाभ मिळवून देतील अशी माहिती शहरजिल्हाध्यक्ष मिलिंद गंधे यांनी दिली.

- Advertisement -

भाजप युवा मोर्चाच्यावतीने आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत शहरातील पदाधिकार्‍यांच्या नियुक्तीचे पत्र भाजपा शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष महेश तवले, सिद्धार्थ ठाकूर, सिद्धार्थ गदीया, डॉ.दर्शन करमाळकर, निलेश सातपुते, अ‍ॅड.आशिष पोटे, आशिष अनेचा, अमोल निस्ताने, राकेश भाकरे उपस्थित होते.

योजनेंतर्गत समाजातील प्रतिष्ठीत व तज्ञांद्वारे मार्गदर्शन मिळवून आपले व्यवसाय, नोकरी यामध्ये प्रगती साधता येईल. त्यातून मेक इन इंडिया सारख्या योजनेला चालना मिळवून प्रत्येकांच्या हाताला काम मिळवून प्रत्येकजण आत्मनिर्भर होईल. यासाठी तज्ञांची नियुक्ती करण्यात येत आहे. याद्वारे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रशिक्षण घेऊन प्रगती साधावी. याबाबत लवकरच प्रत्येक भागात तज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात येईल. नूतन पदाधिकारीही चांगल्याप्रकारे मार्गदर्शन करतील, असा विश्वास गंधे यांनी व्यक्त केला.

भाजयुमोचे शहरजिल्हाध्यक्ष महेश तवले म्हणाले, आज युवकांमध्ये काहीतरी करुन दाखविण्याची क्षमता आहे. अशा युवकांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास देशाच्या प्रगतीत ते हातभार लावू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील युवक व सर्वसामान्यांना तज्ञाद्वारे मार्गदर्शन करुन त्यांच्या अडचणी सोडविण्यात येणार आहेत.

यावेळी अभिजित चिप्पा, लक्ष्मीकांत तिवारी, वसंत राठोड, सुजित खरमाळे, सुबोध रसाळ, पियुष संचेती, किरण जाधव, आनंद निंबाळकर, साहिल शेख, किशोर कटोरे आदि उपस्थित होते. प्रास्तविक अमोल निस्ताने यांनी केले. सूत्रसंचालन आशिष अनेचा यांनी केले तर अभिजित चिप्पा यांनी आभार मानले.

हे आहेत आत्मनिर्भरचे पदाधिकारी

संयोजक- सी.ए. सिद्धार्थ ठाकूर,

सहसंयोजक – टॅक्स कंन्स्लटंट सिद्धार्थ गदीया, डॉ.दर्शन करमाळकर, अ‍ॅड.आशिष पोटे, निलेश सातपुते

- Advertisment -

ताज्या बातम्या