अहमदनगर : ढोल ताश्यांच्या गजरात भिंगारमध्ये रविवारी बाप्पाला निरोप

0

95 मंडळापैंकी 15 मंडळ मिरवणुकीत

अहमदनगर (प्रतिनिधी)- 95 सार्वजनिक गणेश मंडळांनी भिंगारमध्ये श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. रविवारी भिंगारमधील बाप्पाला निरोप दिला जाणार आहे.

यंदा मानाचे 15 गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. रविवारी (दि.3) सकाळी साडेअकराच्या सुमारास पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते पुजा झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरूवात होणार आहे.

मनाच्या देशमुख गणपतीला रुद्रनाद वाद्यपथक तर आझाद तरुण मंडळाला निर्विघ्नं वाद्य पथक असणार आहे. 

पोलिसांनी दीडशे जणांना नोटीस बजावली असून रूटमार्च काढून शक्तीप्रदर्शन केले.

रविवारी होणार्‍या विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सहाय्यक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रूटमार्च काढण्यात आला. भिंगारचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी छावणी मंडळ व संबंधितांशी विसर्जन मिरवणुकीसंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. नियोजनासाठी पोलिसांच्या हातात अजून दोन दिवस असल्याने नियोजनात कुठेच कमी पडणार नाही याची दक्षता पोलीस घेत आहेत.
भिंगारमधील विसर्जन मिरवणूक शांततामय वातावरणात पार पडावी यासाठी पोलिसांनी तब्बल वीस वेगवेगळ्या बैठका घेतल्या. नागरी समन्वय समिती, जातीय सलोखा समिती, शांतता कमिटी समिती, जेष्ठ नागरिक समिती, खाटीक समाजाची बैठक, हिंदुराष्ट्र सेनाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन एकोप्यात श्रींचे विसर्जन करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले.

असा असेल बंदोबस्त
मिरवणूक मार्ग 250 पोलीस कर्मचारी
10 पोलीस अधिकारी

उल्लंघन केल्यास माफी नाही
भिंगारच्या विसर्जन मिरवणुकीची पूर्ण तयारी झाली आहे. मिरवणुकी दरम्यान कोणत्याही राजकीय किंवा गुंड प्रवृत्तीला थारा दिला जाणार नाही. स्थानिक नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल असे कृत्य करु नये. तसे झाल्यास कोणाला माफ केले जाणार नाही.
– डॉ. अक्षय शिंदे, सहायक पोलीस अधिक्षक

 

LEAVE A REPLY

*